BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : माऊंट सेंट अॅन हायस्कूल मधील कला, साहित्य प्रदर्शनाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेंट अॅन हायस्कूल या शाळेत स्वच्छ भारत अभियान या विषयांतर्गत शाळास्तरीय कला व साहित्य प्रदर्शनाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि आकर्षक तसेच टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती स्वतः तयार करून मांडल्या होत्या.

या प्रदर्शनाचे उद्घाटन सिस्टर लेतीशा यांच्या हस्ते आणि बालविकास शाळेच्या मुख्याध्यापिका हेलन अँथोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि आकर्षक तसेच टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती स्वतः तयार करून मांडल्या होत्या.

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर आयरीन, सिस्टर प्रेमा, प्राथमिक विभाग प्रमुख सिस्टर रेझिना आणि इतर शिक्षकांनी विषेश परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी हा मंच उभारून दिला. सर्व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like