Talegaon Dabhade : श्री. डोणुआई देवीच्या नवरात्रौत्सव समितीच्या अध्यक्षपदी मयुर घारे

एमपीसी न्यूज – डोणे (ता. मावळ) येथील ग्रामदैवत श्री. डोणुआई देवीच्या नवरात्री महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मयुर घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीची निवडही बिनविरोध करण्यात आली.

यावेळी एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे, अध्यक्ष योगेश कारके, रवि काळभोर, विशाल कारके, रणजित खिलारे, मल्हारी खिलारे, सागर चांदेकर, सोमनाथ खिलारे, कृष्णा खिलारे, भानुदास कारके व पोलिस पाटील उमेश घारे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

डोणे येथील ग्रामदैवत श्री. डोणुआई देवी हे जागृत ग्रामदैवत म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची श्रद्धा आहे.

डोणे येथे एकता प्रतिष्ठाणच्यावतीने दरवर्षी नवरात्री उत्सवनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात महिलांसह आबालवृद्धांचा मोठा सहभाग असतो.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष: मयुर घारे, कार्याध्यक्ष जीवन शिंदे, उपाध्यक्ष रोहन जंगम, खजिनदार विश्वास चांदेकर, सचिव संकेत लांडगे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.