Talegaon Dabhade : कलापिनीतर्फे शनिवारी ‘देणे दोन गंधर्वांचे’

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील अष्टपैलू कलाकार पं.सुरेश साखवळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “देणे दोन गंधर्वांचे” हा भक्ती- नाट्यसंगीताचा विशेष कार्यक्रम कलापिनी कलामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. ३) कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

तळेगावातील संगीत अभ्यासक संपदा थिटे व पुण्यातील प्रसिद्ध गायक चिन्मय जोगळेकर हे बालगंधर्व व छोटा गंधर्व यांची नाट्यपदे, भक्ती गीते आणि अभंग सादर करणार आहेत. पं.सुरेश साखवळकर हे या दोन गंधर्व गायकांच्या गायकीचे मर्म उलगडून दाखविणार आहेत.

या कार्यक्रमाला ऑर्गन साथ लीलाधर चक्रदेव आणि तबला साथ अभिजित जायदे करणार आहेत. हा दुर्मिळ योग रसिकांनी चुकवू नये असे आवाहन कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.