Talegaon Dabhade News : चांगल्या शिक्षण संस्थांमुळे राष्ट्राची प्रगती –  गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – पुर्वीच्या शिक्षण पद्धतीत व आजच्या शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या कालसुसंगत शिक्षणव्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना चरितार्थाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आज चांगल्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गणेश भेगडे (Talegaon Dabhade News) यांनी केले.
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गणेश भेगडे यांच्या हस्ते इंद्रायणी महाविद्यालयात ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. मी ही इंद्रायणी महाविद्यालयाचाच विद्यार्थ्यी होतो. परंतु तेव्हाचे आणि आताचे महाविद्यालय यात खूप मोठा फरक आहे. याचे निर्विवाद श्रेय इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या दूरदृष्टीला जाते ,असे भेगडे म्हणाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा,लायन्स क्लबचे गोपाळ राठी,संजय साने,परेश पारेख, विलास काळोखे, संजय वाडेकर, युवराज काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के मलघे, बी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय आरोटे, डी फार्मसीचे प्राचार्य जी.एस शिंदे, उपप्राचार्य ए आर जाधव, प्रा. एम एम ताटे, साहेबराव गावडे, रविकांत सागवेकर,दशरथ जांभुळकर तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 भेगडे म्हणाले की,’आज जी 20′ चे यजमानपद भारत देशाला मिळाले हा देशाचा मोठा सन्मान आहे. तळेगाव हे शिक्षणाचे माहेरघर आहे. आज विस्तारलेल्या सोयी सुविधांचा उपयोग प्रत्येक (Talegaon Dabhade News) विद्यार्थ्यांनी करून घेतल्यास मोठी शैक्षणिक क्रांती घडेल आणि देशाच्या प्रगतीस त्याचा उपयोग होईल ,असे मत भेगडे यांनी व्यक्त केले.

यावेळी मावळ तालुक्यासाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भेगडे यांना आवाहन करताना आपल्या अध्यक्षीय भाषणात रामदास काकडे म्हणाले की, सत्तेपेक्षा संघटना मोठी असते. सत्ता आणि संघटना जिथे एकत्रित मिळून काम करतात त्या भागाचा विकास लवकर होतो, म्हणून मावळातील पर्यटन, शैक्षणिक,सहकार आदी आर्थिक सुधारणा यामध्ये भेगडे यांनी पुढाकार घ्यावा. त्यातूनच तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या (Talegaon Dabhade News) हाताला काम मिळेल अशी तजवीज करावी. प्रगतीसाठी नेहमीच सूक्ष्म नियोजनाची आवश्यकता असल्याचे सांगून ,काकडे यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांचाच सहभाग असल्याचे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या कलात्मक विकासासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
महाविद्यालयातील गायन आणि वाद्यपथकाने देशभक्तीपर गीते सादर केली आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी इंद्रायणी महाविद्यालयाची गरुड झेप होत असल्याचे सांगून आगामी काळात (Talegaon Dabhade News) इंद्रायणी विद्यापीठ होणार असल्याचे सांगितले. तर शारीरिक शिक्षण संचालक डॉ.सुरेश थरकुडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.