Talegaon Dabhade : नवीन समर्थ विद्यालयाला आयएसओ मानांकन

एमपीसी न्यूज-  तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित नवीन समर्थ विद्यालयाला नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले. या मानांकनामुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

नवीन समर्थ विद्यालय शाळेची स्थापना १९0६ साली झालेली असून या शाळेची स्थापना लोकमान्य टिळक आणि गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी केली. राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक आहे. तळेगावातील पहिली मराठी माध्यमाची या भागातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रमशील व सर्व सुविधांनी युक्त शाळा आहे. कृतीशील शाळा पुरस्कार प्राप्त झालेली ही शाळा असून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळा सुशोभीकरणासाठी अध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी नेहमी कार्यरत असतात.

शाळेला आयएसओ मानांकन मिळावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे आणि सचिव संतोष खांडगे, आमदार संजय तथा बाळा भेगडे, सुरेशभाई शहा, वसंतराव खांडगे, यांच्या मार्गदर्शनाने एप्रिल २०१८ पासून शाळेतील सर्व अध्यापकांनी सर्व प्रकारे प्रयत्न करून शाळेत अनेक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या. स्पर्धा परीक्षा, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले. आधुनिक संगणक कक्ष, इ-लर्निंग हॉल, सभागृह, बास्केट बॉल मैदान, प्रयोगशाळा, बोलक्या भिंती, सूचना फलक या सर्व गोष्टींमुळे शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त झाले. आयएसओ मानांकनासाठी शाळेचे परीक्षण धनंजय कदम यांनी केले.

तळेगावातील एकमेव आयएसओ मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा झाल्याने तालुक्यातील सर्व स्तरांतून शाळेचे कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार सुरेश शहा आणि शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा यांनी शाळेचे मुख्याध्यापक कैलास पारधी आणि पर्यवेक्षक बाबाराव आंभोरे, अध्यापक पांडुरंग पोटे, सुदाम वाळुंज, मच्छिंद्र कांबळे, सविता चव्हाण, योगेश पाटील, गंगाराम खंडागळे, संजय कसाबी, दत्तात्रय ठाकर यांच्यासह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

सूत्रसंचालन रेवप्पा शितोळे यांनी केले तर आभार अर्चना शेडगे मॅडम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.