TalegaonDabhade : अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबदल कुलदीप जाधव यांचा नवलाख उंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

एमपीसी न्यूज – नवलाख उंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने जाधववाडी गावातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र कुलदीप बबन जाधव यांची राजपत्रीत जिल्हा आणि महिला बाल कल्याण अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबदल त्यांचा सत्कार ग्रामपंचायतमध्ये करण्यात आला. त्यांचा सन्मान सरपंच दत्तात्रय पडवळ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी उपसरपंच संदीप शेटे, आबाजी बधाले, सदस्य कांताबाई पडवळ, स्वाती जगनाडे, इंदुबाई भांगरे, सविता भालेकर, ग्रामविकास अधिकारी प्रमिला घोडेकर, सोपान नरवडे, तानाजी पडवळ, दत्तात्रय शिर्के, सुधीर धायबर, गवळी शिंदे, दत्तात्रय खोल्लम,वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेविका मायाताई चव्हाण, सदाशिव बधाले, विजय शेटे, गोरख भालेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • कुलदीपने अनेक वर्षे वेगवेगळ्या पदासाठी परीक्षा दिल्या. आपल्या मनासारखी नियुक्ती होत नाही म्हणून त्याने काही नाकारल्या. यावेळी चांगली नेमणूक झाली, म्हणून त्याचे स्वागत संपूर्ण भागातून होत आहे.

यावेळी सरपंच पडवळ म्हणाले कुलदीप हे गावातील तरूणांसाठी प्रेरणा व मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या माध्यमातून अनेक तरूण स्पर्धा परीक्षेत गाव आणि तालुक्यातुन यश प्राप्त करू शकतील. कुलदीपला पुढील कार्यात अजून खूप यश प्राप्त होवो. शेतकरी कुंटुंबातुन व गरीब घरातील मुलगा मोठ्या पदावर जाणे हि गावाची शान आहे.जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेत मोठे यश प्राप्त करतो. ही फार मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे.

यावेळी कुलदीप जाधव यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, मी कितीही मोठा अधिकारी झालो तरी माझं गाव आणि माझी माणसं यांना मी कधीही विसरू शकणार नाही.आई-वडिलांनी मला प्रेरणा दिली तसेच घरातून चांगली साथ भेटली. म्हणून मी आज येथ पर्यंत पोचलो आहे. माझे स्वप्न आहे कि तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व्हायचं, या परीक्षा मी नोकरी करीत देतच राहणार आहे.गावातील समाजासाठी लागणारी मदत मी कुठेही राहिलो तरी करत राहणार आहे.

यावेळी सरपंच दत्तात्रय पडवळ जालिंधर शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार मा.उपसरपंच महेश शिर्के यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.