Talegaon Dabhade : राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना सेवा संघटनेचा पाठिंबा

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार सुनील शेळके यांना सेवा संघटना महाराष्ट्र प्रदेशतर्फे बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. एका पत्राद्वारे हा पाठिंबा मंगळवारी (दि. 15) देण्यात आला. सुनील शेळके यांची समाजाबद्दल असलेली तळमळ आणि लोकप्रियता पाहून सेवा संघटनेने शेळके यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

‘सेवा’ ही संघटना ख्रिश्चन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लढणारी सामाजिक संघटना असून संपूर्ण महाराष्ट्र हे संघटनेचे कार्यक्षेत्र आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांचे समाजाप्रती असणारी संवेदनशीलता आणि तळमळ पाहून तसेच त्यांची सर्व स्तरातील लोकप्रियता पाहून त्यांना समर्थन देणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश बेंजामिन यांनी कळवले आहे.

मंगळवारी लोणावळा येथे सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सुनील शेळके यांच्याकडे हे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी अध्यक्ष महेश बेंजामिन यांच्यासह तालुका अध्यक्ष संजय कुलकर्णी, जॉन पवार, विल्सन जॉन, अजय कुलकर्णी, वसंत जॉन, प्रतीक कुलकर्णी, पास्टर सोहम जाधव, रॉक्सवेल गुजे, डॅनियल गुजे, राजेश बोरकर, निलेश बोरकर, आशिष पगारे, पॉल, अतुल वाघमारे, अमोल पगारे, विल्सन बोरकर, बाबा ओव्हाळ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.