Talegaon Dabhade : वराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या प्रियंका भेगडे बिनविरोध

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका रामदास भेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आधीचे उपसरपंच विशाल मराठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

प्रियंका भेगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक धेंडे व सरपंच मनिषा शिंदे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

त्यावेळी माजी सरपंच विश्वनाथ मराठे, माजी ग्रामपंचायत सदस्य व तळेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मराठे (पाटील), माजी उपसरपंच संतोष मराठे, निलेश मराठे,माजी ग्रापंचायत सदस्य कल्पेश मराठे, उद्योजक नितीन भोंगाडे, उद्योजक रामदास मांडेकर,उद्योजक गुरुदेव मराठे, विकास मराठे, सोमनाथ कोयते, अमोल मराठे, गौरव लोंढे, दिपक कारेकर, समीर बनसोडे, उपसरपंच विशाल मराठे,सदस्य सारिका रामदास मांडेकर, मनिषा राम मराठे, अस्मिता निलेश मराठे, रुपाली राजाभाऊ आढळे, सिमा विकास मराठे, विकास भाऊ पवार, निलेश दत्तू मराठे, गणेश मच्छींद्र मराठे, अभिषेक ज्ञानेश्वर मराठे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आमदार सुनील अण्णा शेळके, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक व उद्योजक किशोर आवारे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आदींच्या सुचनेनुसार प्रियंका भेगडे यांचे नाव निश्चित करण्यात आले.

आमदार सुनील अण्णा शेळके यांचे हस्ते सौ भेगडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

एकूण 15 सदस्य संख्या असलेली ही वराळे ग्रामपंचायत मावळ तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असल्याने व गावाचे झपाट्याने होत असलेले शहरीकरणामुळे या ग्रामपंचायतीवर सर्व राजकीय पक्षाचे प्रामुख्याने लक्ष असते त्यात मावळात यावेळच्या विधानसभेच्या विजयाने राष्ट्रवादीला संजीवनी मिळाली असल्याने मावळात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले दिवस आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.