Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा रबर उद्योगाशी संबंधित दोन संस्थांशी करार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिचंवड एज्युकेशन ट्रस्ट (Talegaon Dabhade)तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या अंतर्गत बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्स मधील रबर टेक्नॉलॉजी कोर्स सुरु आहे. या कोर्ससाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ज्ञान मिळण्यासाठी ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोशिएशन (AIRIA) आणि रबर केमिकल अँड पेट्रोकेमिकल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (RCPSDC) सोबत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने करार केला.

या करारामार्फत रबर आस्थापनांमधील तज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच इंटर्नशिप,प्रकल्प भेटी यासाठी (Talegaon Dabhade) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये डायमेंशनल मेट्रोलॉजी लॅब उभारण्यात आली असून आरसीपीएसडीसी आस्थापनेच्या माध्यमातून जवळपास ३५० हुन अधिक जोडलेल्या औदयोगिक आस्थापनांनमधील कर्मचाऱ्यांना या प्रयोगशाळेचा टेस्टिंगसाठी उपयोग होईल तसेच विद्यार्थ्यांना स्किल कोर्सेससाठी याचा लाभ घेता येईल.

या करारप्रसंगी एआयआरआयएचे चेअरमन रवींद्र बरदे,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार राजेश म्हस्के, विक्रम मकर, विनोद बंसल,आरसीपीएसडीसीचे चेअरमन विनोद पटकोटवर, पुणे चाप्टरचे व्हाईस चेअरमन निनाद जोशी, सदाशिव काळे, अवंतिका मकर,  प्रशांत वाणी, नितीन जोशी, संग्राम पाटील, सुनील बंसल, मिलिंद जोशी, डी. टी केसवानी, एनएमआईटीचे प्राचार्य डॉ.विलास देवतारे, एनसीईआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, कार्यक्रमाचे आयोजन तसेच आयआयआयसीचे प्रमुख  प्रा. मुझाईद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Pimpri : एलिव्हेटेड कॉरिडॉर’द्वारे पुणे-नाशिक महामार्गाला ‘गती’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.