Talegaon Dabhade : ‘प्रतिसाद फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेचा मंगळवारी लोकार्पण सोहळा

एमपीसी न्यूज- लोकसेवेचे ब्रीद जपणाऱ्या, असुविधा आणि समस्येच्या माथी प्रहार करणा-या “प्रतिसाद फाउंडेशन” या सेवाभावी संस्थेचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे कामगार, मदत, पुनर्वसन व भुकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येथील सुशीला मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. 23 ) संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. अशी माहिती प्रतिसाद फाउंडेशनच्या संयोजकांनी दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मावळ भाजपाचे अध्यक्ष प्रशांत ढोरे, जिल्हा प्रभारी गणेश भेगडे, उद्योजक किशोर आवारे,सहकार महर्षी माऊली दाभाडे, माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, पक्षप्रतोद सुशील सैंदाणे,माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, माजी अध्यक्ष यु मो रवींद्र भेगडे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश काकडे, तळेगाव शहर भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र आवारे, संपर्क प्रमुख(प महाराष्ट्र) संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी साद-प्रतिसाद पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, सामाजिक बांधिलकी पुरस्कार, निस्वार्थ सेवा पुरस्कार, मंदिर सेवा आदी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात ५०० बांधकाम मजुरांना साहित्य वाटप, २००० लाभार्थींना आयुष्यमान भारत अंतर्गत कार्ड वाटप, तसेच ५ नगरपरिषद सफाई कामगारांचे पाद्यपूजन करण्यात येणार आहे. तसेच निर्मल वारीचे प्रमुख संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमानिमित्त कला, क्रीडा,संस्कृती आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.