Talegaon Dabhade News : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये 158 वी स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता खेडकर, अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमापूजनाने झाली. या कार्यक्रमात स्वामी विवेकानंदांचे विचार व मूल्य तसेच त्यांचे जीवन प्रसंग यावर आधारित विविध विषयांचा समावेश करण्यात आला होता. श्रवण आढाव या विद्यार्थ्याने त्यांचे विचार व त्याचा मतितार्थ सांगितला. सिद्धी ढोरे या विद्यार्थीनीने शानदार काव्याचे गायन केले. यानंतर आदिती चौरसिया हिने त्यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंगांवर भाषण केले. तन्मय दिघे व आयुष दिघे या विद्यार्थ्यांनी आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारे घोषवाक्य सादर केली. विद्यालयातील शिक्षिका अर्चना आठवले य़ांनी कविता प्रस्तुत केली.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता खेडकर यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून आजच्या युवा पिढीला संदेश दिला की आपल्या शब्दांपेक्षा आपले विचार खूप महत्त्वपूर्ण आहेत. आजही स्वामी विवेकानंदजी यांचे विचार आपल्याला एक नवचेतना देतात.

यानंतर विद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान शेवकर यांनी देखील आपले विचार प्रस्तुत केले. शेवकर म्हणाले की आजच्या युवकांमध्ये काहीतरी नवीन करण्याची ताकद आहे, त्यांना स्वामी विवेकानंदजी हे उत्तम आदर्श आहेत.

या कार्यक्रमास पहिली ते आठवीचे विद्यार्थी ऑनलाईन तर 9 व 10 चे विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, अध्यापक वृंद व विद्यार्थी यांनी केले होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुहानी वाघमारे या विद्यार्थीनीने केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.