Talegaon Dabhade News : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा तळेगाव दाभाडे पत्रकार संघाकडून पुढे चालविला जात आहे – गणेश भेगडे

एमपीसी न्यूज : आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा तळेगाव दाभाडे पत्रकार संघाकडून पुढे चालविला जात असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 175 व्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार संघाकडून तळेगाव दाभाडे गाव हद्दीत गोरगरीब तसेच कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना दुपारी व संध्याकाळी भोजन व्यवस्था येथील जनसेवा भोजन थाळी आणि नमो भोजन थाळी या माध्यमातून केली जाते. या उपक्रमास पत्रकार संघाच्या वतीने देणगीचा धनादेश देण्याच्या प्रसंगी भेगडे बोलत होते.तसेच यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी देखील पत्रकार संघाच्या या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र माने, नगरसेवक संतोष दाभाडे पाटील, माजी नगरसेवक सचिन टकले, जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, रवींद्र साबळे, दिलीप डोळस, किरण ओसवाल,विनायक भेगडे आदी उपस्थित होते.

यावेळी तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी प्रास्ताविक, तर ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे यांनी पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन सचिव अतुल पवार, मच्छिंद्र बारवकर, श्रीकांत चेपे यांनी केले. तर सुनील वाळुंज यांनी आभार मानले. पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे आणि माजी अध्यक्ष सुनील वाळुंज यांच्या हस्ते धनादेश किशोर आवारे व गणेश भेगडे, रवींद्र माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

जनसेवा भोजन थाळी कायम चालू ठेवण्याचा मानस – किशोर आवारे

कोरोनाच्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये गोरगरीब,सर्वसामान्य जनता, तसेच गरजवंत यांना जनसेवा भोजन थाळी कोरोनाचा संक्रमणाचा कालावधी संपल्यानंतर देखील कायम चालू ठेवण्याचा मानस आवारे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.