Talegaon Dabhade News : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात अण्णासाहेब विजापूरकरांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव गुरुवर्य विष्णू गोविंद तथा अण्णासाहेब विजापूरकर यांची 158 वी जयंती नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये साजरी करण्यात आली.

नूतन अभियांत्रिकीचे प्राचार्य. डॉ. ललितकुमार वधवा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी अभियांत्रिकीचे प्रबंधक विजय शिर्के, विभागप्रमुख डॉ. नितीन धवस, डॉ. शेखर रहाणे, डॉ. संजय सांगे, डॉ. विलास देवतारे, प्रा. जावेद शेख, सुधाकर ढोरे, संतोष शेळके आदी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. वधवा यांनी अण्णांच्या कार्याला उजाळा दिला. स्वतंत्रपूर्व काळात राष्ट्रीय अधिवेशनात, राष्ट्रीय आंदोलनाचा चतु:सूत्री कार्यक्रम आखला गेला. ही चतु:सूत्री “स्वदेशी – स्वराज – परकीय मालावर बहिष्कार – राष्ट्रीय शिक्षण” अशी होती. अण्णांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी स्वतः ला वाहून घेतले. 1906 साली समर्थ विद्यालय राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा स्थापन केली. आजही ही ऐतिहासिक संस्था मोठ्या दिमाखात उभी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.