Talegaon Dabhade News : महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी बँक ऑफ बडोदाकडून अर्थसाह्याची ग्वाही

एमपीसी न्यूज – महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी बँक ऑफ बडोदा सढळ हाताने अर्थसाह्य करेल, अशी ग्वाही बँक ऑफ बडोदा आरसेटीच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी यांनी दिली.

मेधावीन फाउंडेशन व बँक ऑफ बडोदा आरसेटीच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या सहा दिवसाच्या व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणाच्या प्रशस्ती पत्रक वितरण समारंभाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश निरीक्षक भारती शेवाळे, कुलस्वामीनी महिला मंचच्या संस्थापिका सारिका शेळके, उद्योजिका स्वाती पवार, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित कुमार, बँकेचे अधिकारी शाम कुलकर्णी हे उपस्थित होते.

महिलांकडे असलेला आत्मविश्वास आणि कौशल्य याचा वापर स्वतःची वेगळी ओळख प्रस्तापित करण्यासाठी करावा असे कुलकर्णी म्हणाल्या.

प्रदेश निरीक्षक भारती शेवाळे म्हणाल्या की आरक्षणामुळे मिळालेले पद त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजून घेऊन आपले काम चोख करावे.

महिलांनी जिद्द ठेऊन हाती घेतलेला उद्योग यशस्वी करून दाखवावा, असे सारिका शेळके म्हणाल्या.

या समारोप समारंभाचे प्रास्ताविक फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली दाभाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्योती शिंदे व स्वाती दाभाडे यांनी केले व आभार निशा पवार यांनी मानले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रशस्ती पत्रकाचे वाटप करण्यात आले.प्रशिक्षणाचे नियोजन बँक ऑफ बडोदा आरसेटीचे मंगेश माने व सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.