_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade News: शिवरत्न सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन भालचंद्र राऊत यांचे निधन

तळेगाव दाभाडे –  इंदोरी येथील श्री संत जगनाडे महाराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माळवाडी येथील शिवरत्न सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक भालचंद्र राऊत (वय ४९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. कै.राऊत हे अतिशय शांत व प्रेमळ स्वभावाचे होते.त्यांच्या अकाली जाण्याने गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.

कै.राऊत हे माजी आदर्श सरपंच सुनंदाकाकू राऊत यांचे पुतणे तर उद्योजक जयंत राऊत व हभप अनिल राऊत यांचे बंधू होत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.