Talegaon Dabhade News: भाजप महिला मोर्चा व युवती आघाडीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार कुठलेही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. या वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात तळेगाव दाभाडे शहर महिला मोर्चा व युवती आघाडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी भेगडे, अंजली जोगळेकर,  कार्याध्यक्षा अश्विनी काकडे,  तनुजा दाभाडे, युवती आघाडी अध्यक्षा अपूर्वा मांडे,कार्याध्यक्षा धनश्री बागले यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनी भेगडे, युवती आघाडी सचिव तेजल भेगडे हिने युवतींच्या वतीने मनोगत व्यक्त केले.नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, शहराध्यक्ष रवींद्र बाळासाहेब माने यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या वेळी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवती आघाडी अध्यक्षा अपूर्वा मांडे यांनी केले.

आंदोलनात महेंद्र पळसे, गटनेते अमोल शेटे, नगरसेवक अरूण भेगडे, सुशील सैंदाणे, सुरेश दाभाडे, तालुका भाजप महिला उपाध्यक्षा नगरसेविका शोभाताई भेगडे, नगरसेविका काजल गटे, विभावरी दाभाडे, कल्पना भोपळे, संघटन मंत्री सचिन टकले, खजिनदार सतीश राऊत, सरचिटणीस  विनायक भेगडे, प्रदीप गटे, रवींद्र भोसले, रवींद्र  साबळे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनील कांबळे, प्रज्ञा आघाडी कार्याध्यक्ष पद्मनाभ पुराणिक, किसान मोर्चा अध्यक्ष अजय भेगडे, महिला मोर्चा सरचिटणीस मीना अजय भेगडे, वनिता वळामे, अर्चना पिंपळखरे, उपाध्यक्षा ज्योती दीपक भेगडे, संज्योक्ता प्रशांत आगळे, प्रसिद्धी प्रमुख सोनाली शेलार, उपाध्यक्षा नीलिमा सागर भेगडे, संध्या गणेश माने, संघटनमंत्री अपूर्वा पिंपळखरे, उपाध्यक्ष प्रगती भेगडे, प्रसिध्दी प्रमुख वैष्णवी भेगडे, सरचिटणीस स्नेहा भेगडे, उपाध्यक्षा रोशनी ओसवाल हे सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.