बॉडी बिल्डर संदेश नलावडे यांना मिस्टर एशिया स्पर्धेच्या तयारीासाठी 51 हजार रुपयांची मदत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर संदेश नलावडे यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष मुऱ्हे यांनी 51 हजाराची मदत केली. आगामी मिस्टर एशिया स्पर्धेची तयारी करण्यासाठी ही मदत करण्यात आली आहे. नलावडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना हा मदतीचा हात देण्यात आला आहे. नलावडे यांनी देखील आगामी स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचा विश्वास दाखवला.

संदेश नलावडे हा मावळातील रहिवासी असून महाराष्ट्रातील एक प्रथितयश असा बॉडी बिल्डर आहे आणि त्याने वेगवेगळ्या स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवून हे सिद्धही केलं आहे. पुढील तीन ते चार महिन्यात होऊ घातलेल्या मिस्टर एशिया स्पर्धेसाठी देशभरातून बॉडी बिल्डर तयारी करत आहेत त्यामुळे स्पर्धा ही अत्यंत चुरशीची होईल यात शंका नाही त्यामुळे या स्पर्धेची तयारीही तशीच असली पाहिजे. आणि ही तयारी करण्यासाठी मोठा खर्च आहे नलावडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता हिबाब संतोष मुऱ्हे यांना समजली आणि त्यांनी नलावडे यांना कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची इच्छा बोलुन दाखवली व महाराष्ट्राचे युवा नेते पार्थ अजित पवार यांच्या हस्ते सोमाटणे मावळ येथे नलावडे यांच्याकडे धनादेश देऊन सुपूर्दही केली.

यावेळी उद्योजक श्रेयश भोंडवे, स्वप्नील गडदे, अमोल गोपाळे आदी उपस्थित होते.

याबाबत मुऱ्हे म्हणाले की ग्रामीण भागात संदेश सारखे होतकरू व नवोदित स्पर्धक जर चमकले तर महाराष्ट्रात आणखी बॉडी बिल्डर तयार होतील. आणि जर फक्त आर्थिक परिस्थिती नाही म्हणुन स्पर्धक परत येता कामा नये. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर आले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांमध्ये हा वारसा जाईल आणि समाजाच्या तळागाळातील तरुण आपली शरीर यष्टी बनवतील आणि भविष्यातही असे स्पर्धक घडतील.

पुढे बोलताना ते म्हणाले की या स्पर्धेचा तरुणांना आणखी खुप मोठा फायदा होतो तो म्हणजे अशा प्रकारच्या स्पर्धेची तयारी करणारे तरुण व्यसनाच्या वाटेला जात नाहीत आणि आपोआप एक निर्व्यसनी पिढी घडली जाते म्हणुन तरुणांनी आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता व्यायाम करावा व संदेश नलावडेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तयारी करावी.

मदत स्वीकारताना संदेश नलावडे म्हणाले की मुऱ्हे यांनी केलेल्या मदतीमुळे आमच्या सारख्या स्पर्धकांचे मनोबल वाढते आणि याचा फायदा आम्हाला स्पर्धेत होतो.यावर्षी मी हा किताब जिंकणारच असा विश्वासही यावेळी नलावडे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.