Talegaon Dabhade News: गणेशोत्सव शांततेत व साधेपणाने साजरा करा – अमरनाथ वाघमोडे

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने आणि शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करावे व उत्सव काळात कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेत रहावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी केले.

तळेगाव दाभाडे  नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या  पदाधिकारी आणि निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी येथील पोलीस ठाण्याच्या आवारात बैठक घेण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, कुंदा गावडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे,संदीप गाडीलकर, नगरसेवक निखिल भगत, अनिल भांगरे, आशिष खांडगे,कल्पेश भगत, रवींद्र हुंडारे, केदार मेढी, ऋषीकेश दाभाडे, योगेश भेगडे, प्रकाश नवले, ओंकार जाधव,आकाश पवार, नागेश भालेराव, शैलेश महाडीक,राकेश लोणकर, विवेक गवारी, प्रदीप साठे, विनय माने, सुशील गायकवाड, लहू भालेकर, गणेश शिंदे, राम येवले, संदीप पिंगळे, मुकूल गंगाळे, लहू पाटील, बुवा ढेरंगे, प्रियश कुलकर्णी,विकास अरगडे, नरेश मु-हे तसेच मानाच्या गणपतीसह विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उत्सव काळातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी. मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा. सजावटीत भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४फूट तर घरगुती गणपतीसाठी २फूट उंचीची मर्यादा. पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू अथवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे.शाडू अथवा पर्यावरण पूरक मूर्तीचे  विसर्जन घरीच करावे.

सांस्कृतीक कार्यक्रम घेऊ नये.आरती, भजन, कीर्तन हे धार्मिक विधी करतांना ध्वनी प्रदूषण तसेच गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे. अशा प्रकारच्या मार्गदर्शक सुचना यावेळी देण्यात आल्या.

शहाजी पवार, दुर्गानाथ साळी यांनीही मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.