Talegaon Dabhade News: जनसेवा विकास समितीच्यावतीने नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीच्यावतीने जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे व जनसेवा विकास समिती सदस्यांच्या आर्थिक सहभागातून तळेगाव परिसरासाठी नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता दोन ॲम्ब्युलन्स लोक सेवेसाठी  देण्यात आल्या होत्या व आज शनिवार (दि 19) रोजी पुन्हा एक नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स (किंमत साधारण एकोणीस लाख रुपये) जनसेवेसाठी देण्यात आली.

या ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण आज सायं 6:00 वा. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण कानडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे,विरोधी पक्षनेते  गणेश काकडे, नगरसेवक निखिल भगत, उद्योजक अनिल पवार, कल्पेश भगत, नगरसेवक रोहित लांघे, सुनील कारंडे, राहुल जाधव, निरंजन जागीरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.