Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे येथे दिव्यांगानी घेतला मोफत दिव्यांग शिबिराचा लाभ

एमपीसी न्यूज –  रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व रोटरी क्लब ऑफ पुना (Talegaon Dabhade News) एअरपोर्ट, साक्षी मशीन अँड टूल्स प्रा. लि.,भारत विकास परिषद  कोथरूड व पिंपरी चिंचवड यांच्या सहयोगाने रविवारी (दि.19)  दिव्यांगासाठी अत्याधुनिक पद्धतीचा कृत्रिम मॉड्युलर पाय  व कृत्रिम हात आणि कॅलिपर शिबीर तळेगाव दाभाडे येथील वं. ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले होते.

 

 

Daund News : रेल्वेखाली उडी मारुन नवविवाहित तरुणाची आत्महत्या

 

 

या मध्ये 75 लाभार्थीनी नोंदणी केली. त्यांचे कृत्रिम पाय व हात या साठी मापे घेऊन त्यांचे साचे बनविण्याचे काम आज भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्र, पुणे यांनी केले.  लाभार्थीना कृत्रिम अवयव देण्याचा कार्यक्रम 21 मे 2023 रोजी होणार आहे . या अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पायाची कमर्शियल किंमत बाहेर 50 हजार पेक्षा जास्त व कृत्रिम हात 15 हजार पर्यंत असून या शिबिरात तसा पाय व हात मोफत दिला जातो.

 

 

 

पराग डायनिंग हॉल, तळेगाव यांनी लाभार्थीना जेवणाची सोय केली. वं. ताई आपटे प्रतिष्ठानने अल्प दराने सभागृह उपलब्ध करून दिले. रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व रोटरी क्लब ऑफ पुना एअरपोर्ट, साक्षी मशीन अँड टूल्स प्रा. लि. यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून हे शिबीर संपन्न झाले.

विकलांग केंद्र पुणे यांच्या कुशल तंत्रज्ञानी मोल्ड  बनविण्याचे काम केले. भारत विकास (Talegaon Dabhade News) परिषदेच्या पिंपरी चिंचवड व कोथरूड शाखेच्या सभासदानी लाभार्थी पर्यंत पोहोचण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.