Talegaon Dabhade News : संत ज्ञानेश्वर विद्यालयास ई- लर्निंग संच भेट

एमपीसीन्यूज : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि रोटरी क्लब पुणे- पाषाण व कंपनीचे अधिकारी आशिष त्रिभुवन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या संत ज्ञानेश्वर माध्यमिक शाळा क्र. 6 येथे डिजिटल स्कूल मोहिमेतंर्गत इयत्ता 9 वी व 10 वी साठी ई- लर्निंग संच भेट देण्यात आला. याचा वर्गात तसेच मैदानावरही वापर करता येणार आहे, अशी माहिती आशिष त्रिभुवन व प्रकल्प प्रमुख महेश महाजन यांनी दिली.

उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते ई- लर्निंग संच भेट देण्यात आला. यावेळी तळेगाव नगरपरिषदेचे शिक्षण समितीचे सभापती गणेश खांडगे, आशिष त्रिभुवन, यादवेंद्र खळदे, विलास जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल दांडेकर, प्रकल्प प्रमुख महेश महाजन व प्रकल्प समन्वयक बाळासाहेब चव्हाण, विश्वनाथ मराठे, प्रभाकर निकम, डाॅ सूर्यकांत पुणे, श्रीशैल मेंथे, जनार्दन ढम, अरूण बारटक्के, भालचंद्र लेले, मुख्याध्यापक अमोल पाटील आदी उपस्थित होते.

अमोल पाटील व सुरेखा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर राहूल दांडेकर यांनी आभार मानले.

प्रियंका हातेकर, प्रतिभा काळे, दीपमाला गायकवाड, आशा खुणे, दत्तात्रय कोकाटे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.