Talegaon Dabhade News: माळेवाडी येथील माजी उपसरपंच दशरथ भोंगाडे यांचं निधन

त्यांनी मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली होती.

एमपीसी न्यूज- माळवाडी येथील माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते दशरथ नारायण भोंगाडे (वय 70) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांनी मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली होती.

त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सुना, चार भाऊ, चार बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सुनील भोंगाडे यांचे ते वडील होत. तर मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे यांचे ते बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.