Talegaon Dabhade News : कोरी गडावर दुर्गभ्रमण व प्लास्टिक मुक्त गड किल्ले मोहीम

एमपीसी न्यूज – सह्याद्रीच्या लोणावळा पर्वत रांगेतील कोरी गडावर इंद्रायणी ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनी रविवार दि 17 जानेवारी 2021 रोजी दुर्गभ्रमण व प्लास्टिक मुक्त गड किल्ले ही मोहीम राबविली.

गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून थंड पाण्याच्या बाटल्या व खाद्य पदार्थांचे प्लास्टिक गडकोट परिसरात टाकून दिले जाते. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे व पर्यावरण रक्षण व्हावे या या हेतूने ही मोहीम आखण्यात आली होती.

या अभियानात पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिक बॉटल व इतर कचरा गोळा करून तेथे देखरेख करणारे पुजारी तसेच विक्रेते यांना पर्यटकांना कचरा न करण्याच्या सूचना द्याव्यात असे सांगण्यात आले, त्याच बरोबर विक्रेत्यांना कचरा जमा करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढविणे हाही प्रमुख हेतू आहे. प्रत्येक महिन्यात एक गड किल्ला स्वच्छता मोहीम राबविण्याचा मानस इंद्रायणी ट्रेकर्स ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक सुरेश थरकुडे यांनी केले. दुर्गभ्रमंती प्रमुख प्रज्वल साळवे व स्वच्छता अभियान उपक्रमाचे काम सौरव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.