Talegaon Dabhade News : तळेगावच्या तनया गायकवाडने शोधले चार लघुग्रह

एमपीसी न्यूज – डॉ. कलाम रिसर्च सेंटर व इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सर्च कोऑपरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लघुग्रह शोध मोहिमेत तळेगावच्या तनया गायकवाडने चार लघुग्रह शोधले आहेत. 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान दिल्लीत हा उपक्रम राबविण्यात आला होता. या यशासाठी तनयाचे नाव केंद्रातील लघुग्रह संशोधन यादीत झळकले आहे.

तनया गायकवाड जैन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेते. तनयासह जगभरातील 22 विद्यार्थ्यांना पृथ्वीच्या जवळील आणि मंगळ व गुरूग्रह कक्षेदरम्यान असलेल्या लघुग्रहांना शोधण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर तिने चार ग्रह शोधून यश मिळवले. दिल्लीत पार पडलेल्या कार्याक्रमात डॉ. कलाम रिसर्च सेंटरचे पूर्व सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी तनयाला ‘पुणेज ब्रिलियंट गर्ल’ म्हणून गौरवोद्‌गार काढले.

तनयाच्या या यशाबद्दल जैंन इंग्लिश स्कूलचे संचालक मंडळ तसेच, शाळेचे तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद, आणि कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. सर्वांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या. शाळेच्या विज्ञान शिक्षिका सोनाली उंबरेकर यांनी यासाठी तनयाला मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.