Talegaon Dabhade News : शहरात मोफत डिजीटल प्रशिक्षण केंद्राची सुरुवात

0

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथे समाज विकास संस्थेच्या वतीने मोफत डिजीटल प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. कोविडच्या महामारीतून सावरत असताना रोजगार बुडाल्याने पुन्हा रोजगाराची निर्मिती व्हावी, युवकांना काम मिळावे तसेच बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी समाज विकास संस्थेच्या वतीने तळेगाव परिसरामध्ये डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पल्लवी कांबळे व कीर्ती म्हस्के यांनी दिली आहे.

यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रशिक्षणानंतर सर्व युवकांना विविध ठिकाणी नोकरी आणि रोजगार मिळेल यासाठी संस्था तत्पर असेल, अशी माहिती समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी पत्रकारांना दिली.

हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी स्वयंसेवक प्रसाद कांबळे व विठ्ठलराव कांबळे विशेष प्रयत्न करत आहेत. इच्छुकांनी पल्लवी कांबळे 8452935270 व कीर्ती मस्के 9139737911 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.