Talegaon Dabhade News : गंगुबाई दाभाडे यांचे निधन

एमपीसी न्यूज : गोळेवाडी ( ता. मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या माजी उपाध्यक्षा व विद्यमान संचालक गंगुबाई चिंधू दाभाडे (वय 67) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पती, दोन मुले,मुलगी, सूना, तीन भाऊ, दोन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. पखवाज वादक हभप बाळासाहेब दाभाडे व उद्योजक संजय दाभाडे यांच्या मातोश्री, तर प्रगतीशील शेतकरी प्रकाश कलावडे, भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष रामनाथ कलावडे व उद्योजक दत्तात्रय कलावडे यांच्या त्या भगिनी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.