Talegaon Dabhade News : पाच पांडव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लेखी परवानगी घ्या; दाभाडे घराण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील पाच पांडव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी इच्छुकांनी लेखी परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवगंत सरदार विजयसिंहराजे दाभाडे यांचे वंशज सरदार चंद्रसेनराजे दाभाडे व सत्यशीलराजे दाभाडे हे या मंदिराचे सामायिक मालक आहेत. त्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे.

सरदार चंद्रसेनराजे व सत्यशीलराजे दाभाडे यांच्या वतीने संयुक्तपणे काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पाच पांडव मंदिराच्या मालमत्तेत दिवगंत सरदार विजयसिंहराजे दाभाडे यांचा समान हक्क आहे. त्यांचे वंशज सरदार चंद्रसेनराजे व सत्यशीलराजे दाभाडे हे या मंदिराचे सामायिक मालक आहेत.

मंदिराचा जीर्णोद्धार हे एक चांगले कार्य आहे. ज्यांना वैयक्तिकपणे किंवा कोणत्याही संस्थेला मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा आहे, त्यांना सरदार चंद्रसेनराजे व सत्यशीलराजे दाभाडे यांची लेखी परवानगी घेणे गरजेचे असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.