Talegaon Dabhade News : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम; सर्व शाखांमध्ये मुलीच अव्वल!

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान तंत्रशिक्षण विभाग या सर्व शाखांचे निकाल शंभर टक्के लागले. यावर्षी देखील सर्व शाखांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान तंत्रशिक्षण विभाग यासर्व शाखांचे निकाल शंभर टक्के लागले असून यावर्षी देखील प्रथम क्रमांकामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. शास्त्र शाखेतून जानवी श्रीपाद भिडे या विद्यार्थिनीने 99 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला असून मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे .वाणिज्य शाखेतून साक्षी अंकुश गराडे या विद्यार्थिनीने 94.30 टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकाविला असून कला शाखेतून भिल्ल नीता कुमारी श्रीपाद या विद्यार्थिनीने 86 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

तर तंत्रशिक्षण विभागातून लक्ष्मी ईश्वर नारायणकर या विद्यार्थिनीने 75.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. मावळ तालुक्यातून सलग तिसऱ्या वर्षीही इंद्रायणी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने येण्याचा मान पटकविला आहे.

महाविद्यालयाचे इतर निकाल पुढील प्रमाणे :
विज्ञान शाखा – 
द्वितीय क्रमांक- कुमारी तन्वी उत्तम खाडप 96.16%, अलिया मुजिब शेख 96.16% तृतीय क्रमांक- आनंद प्रशांत शिंदे 95.66%

वाणिज्य शाखा –
द्वितीय क्रमांक- अपेक्षा सुभाष मराठे 90.66%,
तृतीय क्रमांक- सृष्टी संजय पचपिंड 89.00%

कला शाखा – 
द्वितीय क्रमांक – अदिती शाम दगडे 83.33%,
तृतीय क्रमांक- सानिका शामराव भोसले 83.00%

तंत्रशिक्षण विभाग –
द्वितीय क्रमांक- सौरभ धनंजय काटकर 73.50%,
तृतीय क्रमांक – पंकज सिद्धेश्वर सुर्यवंशी 73.16%

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा तसेच संचालक विलास काळोखे, गणेश खांडगे, निरुपा कानिटकर, गणेश भेगडे, संदीप काकडे तसेच मार्गदर्शक परेश पारेख, उद्योजक विक्रम काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, उपप्राचार्य अशोक जाधव, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. यु.एस.खाडप, वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. एस.पी.भोसले, कला शाखेचे प्रमुख प्रा.के.डी. जाधव, तंत्रशिक्षण विभाग प्रमुख प्रा.एन.टी. भोसले तसेच सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

इंदायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. याआधी शिवछत्रपती पुरस्काराने अनेक विद्यार्थी सन्मानित झाले आहेत. तसेच आयआयटी, एमबीबीएस, इंजिनीअरिंग, मेडिकल- फार्मसी, बँका, इन्शुरन्स कंपन्या आदी क्षेत्रात तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर आयुक्त, जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर संस्थेचे विद्यार्थी अधिकारी झाले आहेत.

या विद्यार्थ्यांकडूनही अशीच परंपरा जोपासली जात आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो! भविष्यात इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या महाविद्यालयातून नोबेल पारितोषिक विजेते घडवले जातील, यासाठी संस्था सर्वोतोपरी प्रयत्न करील.

– रामदास काकडे (अध्यक्ष- इंद्रायणी विद्यामंदिर संस्था, तळेगाव दाभाडे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.