Talegaon Dabhade News: नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्याला 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.

एमपीसी न्यूज- नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने स्वच्छता, निर्जंतुकीकरण व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते गणेश काकडे आणि ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडे ही मागणी केली होती.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने गुरुवार (दि.20) याला मंजुरी देण्यात आली. आरोग्य कर्मचारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करत असून त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून भूमिका करत आहेत.

हे कर्मचारी शहरातील घनकचरा व्यवस्थापन व परिसरातील साफसफाई करण्याची सेवा करतात. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्याला 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.

विरोधीपक्ष नेते गणेश काकडे यांचे अभिनंदन केले. आरोग्य कर्मचारी यांच्यावतीने नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, आरोग्य सभापती सुलोचना आवारे, सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.