Talegaon Dabhade News: कलापिनीचे सक्रिय सदस्य दीपक जगताप यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कलापिनी परिवाराचे सक्रिय सदस्य व वाहतूक व्यावसायिक दीपक दत्तात्रय जगताप (वय 61) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलगे, सून व नात असा परिवार आहे.

कलापिनीचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र होत असतात. अशा कार्यक्रमांना कलाकारांची ने-आण करण्यासाठी कायमच बसची आवश्यकता लागते. ही व्यवस्था दीपक जगताप कलापिनीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मनापासून कलापिनीला नेहमीच मदत करीत असत.

कलापिनीच्या संगीत नाटकांचे मुंबई येथील प्रयोग, पुण्यातील स्पर्धेतील प्रयोग, हिमालयाची सावली नाट्यवाचनाचे दौरे हे कलापिनी परिवारातील सदस्यांच्या कायमच स्मरणात आहेत.

कलापिनी कलामंडळाच्या लोकप्रिय नाटकांनंतर जगताप यांनी रसिकांना रात्री उशिरा, एक-दोन वाजेपर्यंत वडगाव, मनोहरनगर, यशवंतनगर, पैसाफंड अशा दूरच्या ठिकाणी घरी जाण्यासाठी त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ बससेवा पुरवली. त्यामुळेच अनेक ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना लोकप्रिय नाटकांचा आनंद घेता आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.