Talegaon Dabhade News : वाढदिवसानिमित्त कृष्णराव भेगडे यांच्या दातृत्वाची प्रचिती! विविध संस्थांना 55 लाखांच्या देणग्या 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील विविध संस्थांचे संस्थापक, अध्यक्ष, विश्वस्त, आधारस्तंभ तथा मार्गदर्शक असलेले माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी आपल्या 85 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संस्थांना एकूण 55 लाख रुपयांच्या देणग्या जाहीर केल्या. सदर देणग्यांच्या धनादेशाचे वाटपही यावेळी करण्यात आले.

यामध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ 50 लाख रूपये, सकाळ रिलीफ फंड 01 लाख रूपये, तळेगाव जनरल हॉस्पिटल 01 लाख रूपये, पवना हॉस्पिटल 01 लाख रूपये, सेवाधाम हाॅस्पिटल 01 लाख रूपये, मावळ विकास प्रतिष्ठान 01 लाख  रूपये असे एकूण 55 लाख रूपयांच्या देणगींच्या धनादेशाचे वाटप उद्योजक राजेश म्हस्के व कृष्णराव यांच्या कन्या राजश्री म्हस्के यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी विविध व्यक्ती व संस्थाच्या वतीने भेगडे यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सह सचिव नंदकुमार शेलार, वसंतराव भेगडे, दामोदर शिंदे, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष दीपक शहा, खजिनदार शैलेश शाह, विश्वस्त सुरेशभाई  शहा, ज्येष्ठ नेते शंकरराव शेलार, प्रभाकर ओव्हाळ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, डॉ सत्यजित वाढोकर, विनायक अभ्यंकर, सुखेंदु कुलकर्णी, डाॅ अजय ढाकेफाळकर, संदीप काकडे, प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, जनसेवा, आरपीआय आदी संघटनासह विविध संस्था, पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी तसेच तळेगाव शहरातील सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.