Talegaon Dabhade News : गणेश विसर्जन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी महिंद्रा सीआयई कंपनीकडून जेवणाची व्यवस्था

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी महिंद्रा सीआयई कंपनीकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. बंदोबस्तावरील पोलिसांना जेवणाचे पॅकेट देऊन कंपनीने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

उर्से येथील महिंद्रा सीआयइ कंपनीच्या वतीने तळेगाव येथील गणपती विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणाचे पॅकेट देण्यात आले. कार्यक्रमास पोलीस अधिकारी आणि कर्म कर्मचारी उपस्थित होते.

कंपनी दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून असे उपक्रम राबवत असते. तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी जेवणाचे पॅकेट स्वीकारून उपक्रमाचे कौतुक केले.

कंपनीच्या वतीने महिंद्राचे जनरल मॅनेजर रवींद्र वैद्य,प्रेमप्रसाद अधिकारी, संदिप पानसरे यांनी नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.