Talegaon Dabhade News : आठवणी श्री डोळसनाथ महाराज उत्सवाच्या!

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील एक प्राचीन गाव आहे. ऐन शिवकाळात इंदुरी आणि तळेगाव ही मावळ भागाची अत्यंत महत्त्वाची ठाणी होती. सेनापती खंडेराव दाभाडे यांचे वडील यसबा दाभाडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी प्रत्यक्ष कामाला होते. सह्याद्रीच्या कुशीत आणि इंद्रायणी, पवना नद्यांच्या सानिध्यात तळेगाव हे सुंदर गाव आहे. तळेगावला खूप मोठं इतिहास लाभला आहे. अशा लौकिक्मान्य पंचक्रोशीचं ‘ श्री डोळसनाथ महाराज ‘ हे ग्रामदैवत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी आणि या वर्षी देखील डोळसनाथ महराज उत्सव होऊ शकला नाही. हा उरूस म्हणजे तळेगाववासियांसाठी आनंदाचा ठेवा आहे. या व्हिडीओ मध्ये बाळाभाऊ भेगडे (श्री डोळसनाथ महाराज नवनिर्माण समिती, अध्यक्ष व माजी मंत्री) , राजेश दादा सरोदे (श्री डोळसनाथ महाराज नवनिर्माण समिती सदस्य), सुधीर गुरव (श्री डोळसनाथ महाराज मंदिराचे गुरव ), शंभरी पार केलेल्या फुलाबाई काळोखे आजी, श्यामराव दाभाडे (श्री डोळसनाथ महाराज नवनिर्माण समिती सदस्य) विद्यमान आमदार सुनील शेळके, श्रीमंत सरदार सत्येंद्रराजे दाभाडे , अतुल दादा रेडे (श्री डोळसनाथ महाराज मंदिराचे पुजारी), गणपतराव काळोखे गुरुजी, राष्ट्रसेविका समितीच्या तळेगाव कार्यवाहिका संध्याताई नाखरे यांनी प्रातिनिधिक मनोगतं व्यक्त केली आहेत.

डॉ. विनया केसकर आणि चैतन्य जोशी यांची संकल्पना आहे. डॉ. सावनी परगी, अनुजा झेंड, चैतन्य जोशी आणि डॉ. विनया केसकर यांनी निवेदन केले आहे. छायाचित्रण आणि संकलन चैतन्य जोशी यांनी केलं आहे.

नवीन पिढ्यांना या उरुसाची ओळख व्हावी आणि जुन्या लोकांच्या आठवणी जाग्या करण्याचा हा प्रयत्न आहे. कलाविष्कार यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नक्की पहा, “गुढीपाडव्या निमित्त, उरूस तळेगावचा ” माहितीचा हा खजिना दोन भागात बसवण्याचा प्रयत्न केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.