Talegaon Dabhade News: मिलिंद शेलार यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळावर निवड

मिलिंद शेलार हे तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव असून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे खजिनदार म्हणूनही यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहे.

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील कलाशिक्षक मिलिंद शेलार यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ (महाराष्ट्र) या संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.

पर्यावरण संरक्षण, संवर्धन, जनजागृती आदी क्षेत्रातील त्यांचे एकूण कार्य विचारात घेता ही नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ष 2020 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.

मिलिंद शेलार हे तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव असून रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे खजिनदार म्हणूनही यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहे.

शेलार हे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सहसचिव असून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या देहूरोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये कलाशिक्षक म्हणून अध्यापनाचे काम करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.