Talegaon Dabhade News: सरसेनापती खंडेराव दाभाडे व उमाबाई दाभाडे यांच्या तैलचित्रांचे अनावरण

​एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये सरसेनापती खंडेराव येसाजी दाभाडे तसेच पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांच्या तैलचित्राचे अनावरण सरसेनापती दाभाडे घराण्याच्या वंशजांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात शनिवार (दि.8) रोजी झालेल्या कार्यक्रमात माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष  सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, चंद्रसेनराजे दाभाडे, सत्यशिलराजे दाभाडे, तेजलराजे दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, संतोष शिंदे, सुरेश दाभाडे, नगरसेविका शोभा भेगडे,मुख्याधिकारी दीपक झिंजाड, विभावरी दाभाडे, काजल गटे, प्राची हेंद्रे, भाजप शहराध्यक्ष रवींद्र माने, माजी अध्यक्ष संतोष दाभाडे, इतिहासकार ॲड. विनय दाभाडे सह मान्यवर उपस्थित होते.

सरसेनापती उमाबाई दाभाडे, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची तैलचित्रे कोल्हापूरचे चित्रकार प्रमोद मोर्ती यांनी साकारली आहेत. यावेळी मान्यवरांनी सरसेनापती दाभाडे घराण्याच्या ऐतिहासिक योगदानाचा आढावा घेतला तर तळेगाव आणि परिसरामध्ये सरसेनापती दाभाडे घराण्याने समाजासाठी केलेली मदत याची देखील माहिती मनोगतामधून व्यक्त केली.

स्वागत व सूत्रसंचालन नगरसेवक सुरेश दाभाडे यांनी केली तर आभार नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.