Talegaon Dabhade News: शाडूच्या गणेश मूर्ती तयार करण्याची ऑनलाइन कार्यशाळा, रोटरीचा उपक्रम

या ऑनलाइन कार्यशाळेसाठी 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच पालक व नागरिकही सहभागी झाले होते.

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आयोजित शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ऑनलाइन कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. पर्यावरणाची सुरक्षा व घरी बसून स्वतः तयार केलेल्या गणेशमूर्तीचा आनंद मिळावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या ऑनलाइन कार्यशाळेसाठी 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच पालक व नागरिकही सहभागी झाले होते. कार्यशाळेस सुप्रसिद्ध मुर्तीकार अतिश थोरात यांनी मार्गदर्शन केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रो. रजनीगंधा खांडगे यांनी यावेळी प्लॉस्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी लाल माती, काळी माती, शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याचा आग्रह पालकात करून पर्यावरण रक्षणाची चळवळ उभारण्याचे आवाहन केले.

संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी सचिव रो. सचिन कोळवणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमूख रो. मिलिंद शेलार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.