Talegaon Dabhade News: कोरोना संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीस नगराध्यक्षाच अनुपस्थित असल्याने विरोधकांकडून निषेध

एमपीसी न्यूज –  तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत 1032 कोरोना रुग्ण आढळले असून आतापर्यंत 32 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  तळेगाव दाभाडे शहरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आज केला.

त्यांनी गुरुवार (दि 17) रोजी सकाळी आयोजित बैठकीला हजर नसल्याने नगराध्यक्षा जगनाडे व प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार यांचा सर्व नगरसेवकांनी जाहीर निषेध केला. सोमवार (दि.21) रोजी सर्वसाधारण सभा घेण्याचे पत्र सर्वच नगरसेवकांनी दिले.

तळेगाव दाभाडे हद्दीत कोरोना केअर सेंटर सुरु करण्याबाबत गुरुवार (दि.17) रोजी प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार यांनी सकाळी 10 वा. बैठक असल्याचे पत्र काढले ते बुधवार (दि.16) सायंकाळी 6 वाजता उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी नगराध्यक्षासह सर्वच नगरसेवकांना पाठविले. प्रभारी मुख्याधिकारी पवार यांनी पुन्हा रात्री 11 वाजता गुरुवारी दुपारी 3 वाजता बैठक असल्याचे पत्र काढले हे पत्र सकाळी 10 वाजता पाहिल्यावर सर्वांना फोन केले पण त्या अगोदरच उपनगराध्यक्षांसह बरेच नगरसेवक उपस्थित झाले. नगराध्यक्ष जगनाडे येण्याची प्रतीक्षा करत बैठक उशिरा सुरु झाली.

उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे म्हणाल्या की, कोविड केअर सेंटर सुरु करण्यात खूपच उशीर झाला आहे. जनतेचा विचार करून नगराध्यक्षा जगनाडे यांनी 58/2 चा वापर केला पाहिजे. नगराध्यक्षा जगनाडे वेळकाढूपणा  करत आहेत. नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ त्वरित बंद करुन नागरिकांना कोरोना महामारीतून बाजूला काढण्यासाठी भेदभाव सोडून एकत्र येऊन काम करू.

किशोर आवारे यांनी नगरपरिषद कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका व औषधोपचार उपलब्ध करून देत नाही. पॉजिटिव्ह रुग्णांसाठी काहीच उपाययोजना करत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांचा अंत्यसंस्कार गॅस दाहिनीवर केले जात असून त्याचा ताण नगरपरिषदेवर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला नगराध्यक्षा जगनाडे उपस्थित नसल्याने कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्या, त्यासाठी कोविड केअर सेंटर तसेच तळेगाव दाभाडे शहर हॉट स्पॉट झाले असून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून नगराध्यक्षा जगनाडे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करीत सर्वच नगरसेवकांनी जाहीर निषेध नोंदविला.

कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी डॉक्टर, जेवण, औषधोपचार जागा निश्चिती बाबत तसेच निधी आदीची माहिती दिली जात नाही. नागरिकांच्या जीवाची काळजी नसलेल्या बेजबाबदार नगराध्यक्षा जगनाडे यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे विरोधीपक्ष नेते गणेश काकडे, नगरसेवक किशोर भेगडे, गणेश खांडगे, किशोर आवारे यांनी जाहीर निषेध नोंदवून सांगितले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, नगरसेवक किशोर भेगडे, गणेश काकडे, गणेश खांडगे, किशोर आवारे, अमोल शेटे, अरुण भेगडे, अरुण माने, निखित भगत, रोहित लांघे, नगसेविका हेमलता खळदे, शोभा भेगडे, अनिता पवार, काजल गटे, प्राची हेंद्रे, विभावरी दाभाडे, मंगल भेगडे भाजप शहराध्यक्ष रवींद्र माने, आशिष खांडगे, समीर खांडगे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.