Talegaon Dabhade News : फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ठेवावे, संशोधक, उद्योजकतेचे ध्येय! – रामदास काकडे

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्यामंदिर संस्था सर्व विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के प्लेसमेंटसाठी प्रयत्नशील आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये संशोधक व उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे. अनुभवासाठी नोकरी महत्त्वाची आहेच परंतु , आयुष्यभर ती न करता त्यातून वेगवेगळया प्रकारचे अनुभव घ्यावेत, असे मार्गदर्शन बी फार्मसीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी केले.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲन्ड इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के’ लागला त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी काकडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे होते. संस्थेच्या विश्वस्त निरूपा कानिटकर, प्राचार्य डॉ.संभाजी मलघे उपस्थित होते.

काकडे पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या स्टार्टअप आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेत आपले योगदान द्यावे, तसेच या कामात संस्थेचे विद्यार्थ्यांना पूर्ण मार्गदर्शन राहील, असा विश्वासही काकडे यांनी यावेळी दिला.

द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रामध्ये अनुक्षा डोंबे या विद्यार्थिनीने प्रथम, तेजस कांबळे व अविनाश भालके यांनी द्वितीय तर समृद्धी सुकाटे हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रामध्ये स्नेहल राक्षे हिने प्रथम व निकिता धस हिने द्वितीय तर, ऋषिकेश शिंदे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.सातव्या सत्रामध्ये वर्षा पवार हिने प्रथम व स्नेहल क्षीरसागर या विद्यार्थिनीने द्वितीय तर कल्पना धोंडकर या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला.

संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार कृष्णराव भेगडे, अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, डॉ.दीपक शहा, चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शाह, संस्थेच्या विश्वस्त निरूपा कानिटकर, डॉ. बी.बी.जैन, डॉ.संभाजी मलघे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.