Talegaon Dabhade News: राज्यशास्त्र पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रा. आर. आर. डोके 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. आर. आर. डोके यांची राज्यशास्त्र अभ्यास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजशास्त्र पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र अभ्यास परिषद राज्य कार्यकारिणीच्या वतीने शनिवार दि 10 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली.

सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी कला राज्यशास्त्र या विषयाचे रिलायबल पब्लिकेशन मुंबई  यांच्या पुस्तकांचे लेखन प्रा आर आर डोके यांनी केले आहे.

प्रा डोके हे इंद्रायणी महाविद्यालयात गेली 20 वर्षापासून राज्यशास्त्र व इतिहास ह्या विषयांचे अध्यापन करीत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून ते उत्तम प्रकारे काम करत आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार चंद्रकांत शेटेसह पदाधिकारी व प्राचार्य डाॅ. एस. के. मलघे, उपप्राचार्य अशोक आर. जाधव आदींनी कौतुक करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

जिल्हा कार्यकारणीच्या माध्यमातून काम करत असताना राज्यशास्त्र विषयाबाबत काही महत्वपूर्ण सूचना ते राज्य पातळीवर मांडणार असल्याचे प्रा. डोके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III