Talegaon Dabhade News: तळेगाव नगरपरिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार सतीश दिघे यांनी स्वीकारला; युनियनच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पदाचा पदभार सतीश दिघे यांनी सोमवारी (दि. 13) स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी दिघे यांचा तळेगाव दाभाडे नगरपरिषद कामगार युनियनच्या वतीने अध्यक्ष रवींद्र काळोखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिघे यांनी तात्काळ बैठक आयोजित करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली.

नवनियुक्त मुख्याधिकारी दिघे हे या अगोदर शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी होते. तसेच जळगाव येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमधून भिवंडी महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची पदोन्नती झाल्‍यानंतर चार महिन्याच्या कालावधीनंतर श्याम पोशेट्टी यांची कायम मुख्याधिकारी म्हणून शासनाकडून नियुक्‍ती झाली होती.परंतु लाचलुचपत प्रकरणांमध्ये अडकल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर कायम मुख्याधिकारी म्हणून सतीश दिघे यांची नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी नियुक्ती केली व दिघे यांनी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारताच मुख्याधिकारी दिघे यांनी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांचे बरोबर सभागृहामध्ये बैठक आयोजित करून कामकाजाची माहिती घेतली.यावेळी नगर परिषदेच्या कामगार संघटनेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.