_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade News: प्रथमच मिरवणूक न काढता गणपती बाप्पांना साधेपणाने भावपूर्ण निरोप

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरात गणेश भक्तांनी आपल्या परंपरेनुसार अतिशय भक्तिभावाने सातव्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन केले. यामध्ये मानाच्या गणपती मंडळांनी परिसरातील विसर्जन कुंडामध्ये, काही नागरिकांनी आपल्या घरात तयार केलेल्या विसर्जन हौदावर, तर काही गणेशभक्तांनी तळेगाव दाभाडे नगर परिषद, जनसेवा विकास समिती व संतोष भेगडे युवा मंच यांनी निर्माण केलेल्या फिरत्या विसर्जन कुंडामध्ये गणरायाचे विसर्जन केले. परिसरात गणेश विसर्जनाचा सोहळा साधेपणाने पण उत्साहाने पार पडला.

_MPC_DIR_MPU_IV

तळेगाव शहरात सात दिवसांचा गणेशोत्सव असतो. सातव्या दिवशी गाव तळ्यावर गणरायाचे दरवर्षी विसर्जन होत असते. या वर्षी कोरोनामुळे गावतळे आणि सार्वजनिक ठिकाणी गणरायाचे विसर्जन करण्यास बंदी केल्याने शासन नियमानुसार विसर्जन प्रक्रिया राबवण्यात आली.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज तालीम मंडळ,  श्री कालिका सार्वजनिक गणेशोत्सव,  तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव, राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव, गणेश तरुण मंडळ या शहरातील मानाच्या पहिल्या पाच गणेश मंडळांनी आपल्या मंडपाच्या परिसरात निर्माण केलेल्या गणेश विसर्जन कुंडात आपल्या पूजेच्या गणपतीचे विसर्जन  भक्तिभावाने  केले.  वेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करण्यात आला.

तळेगाव स्टेशन येथे जनसेवा विकास समितीकडून अनेक ट्रॅक्टर वर उभारण्यात आलेल्या फिरत्या विसर्जन कुंडाचे उद्घाटन तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र पवार यांचे हस्ते झाले. यावेळी जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोर आवारे, नगरसेवक  सुशील सैंदाणे, रोहित लांघे, निखील भगत, संतोष शेळके, सुनील पवार, कल्पेश भगत सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

तसेच गाव भागामध्ये संतोष भेगडे युवा मंच व नगर परिषद तळेगाव दाभाडे  यांनी फिरते श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंड तयार केले होते. त्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरासमोर उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभागृहनेते अमोल शेटे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण भेगडे पाटील, शोभा भेगडे, संध्या भेगडे व मान्यवर उपस्थित होते.

तळेगाव शहरात प्रत्येक प्रभागांसाठी  दोन फिरत्या गणेश विसर्जन कुंडाचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे नागरिकांनी यास चांगला प्रतिसाद दिला. तसेच काही गणेश भक्तांनी नगरपरिषदेने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रामध्ये मूर्तीदान केल्या तर काही नागरिकांनी आपल्या घरीच निर्माण केलेल्या विसर्जन कुंडामध्ये श्री गणरायाचे विसर्जन केले.

यावर्षी कोणत्याही श्री गणरायाचे मिरवणुकीच्या माध्यमातून विसर्जन झाले नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने शासनाचे नियमाचे पालन करून उत्सव साजरा केला व प्रशासनाला सहकार्य केले. विसर्जनासाठी तळे, नदी आदी ठिकाणी तसेच जागोजागी चांगला पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता.

तळेगाव दाभाडे येथे सातव्या दिवसाचे सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी तळे, नदी, विहीर येथे कोरोना पार्श्वभूमीवर गणेशविसर्जनास बंदी असल्यामुळे जनसेवा विकास समिती तळेगाव दाभाडे स्टेशनचे वतीने उद्योजक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शन खाली टॕक्ट्ररवर 15 फिरत्या हौदाची सोय करण्यात आली होती.

त्या सोबत 15 टेम्पो होते. सदर फिरत्या हौदाच्या गाड्या तळेगाव स्टेशन परिसरात यशवंतनगर आनंदनगर,मनोहरनगर, जोशी वाडी, इंद्रायणी कॉलनी आदी ठिकाणी फिरत होत्या त्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. फिरत्या हौदाची गाडी येण्यापूर्वी लोकांना माईकवर सूचना देण्यासाठी फिरत्या रिक्षांचे नियोजन होते. त्यामुळे गणेश भक्तांना आणखी सोयीचे होते.फिरत्या हौदांमुळे गणेश भक्तांची गणेश विसर्जनची सोय होत होती.

यावेळी नागरिकांकडून गणेश मूर्ती घेण्यासाठी शुभम हेंद्रे, सुरेश केदारी, शैलेश पारगे, प्रतीक हेंद्रे, सुनील पवार आदी स्वयंसेवक मदत करीत होते.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.