Talegaon Dabhade News: संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनतर्फे तळेगाव दाभाडे येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  वायसीएम रुग्णालय रक्तपेढी मार्फत 60 युनिट रक्त संकलित करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन निरंकारी मंडळाचे पिंपरी सेक्टर संयोजक  गिरधारीलाल मतनानी यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक आशुतोष हेंद्रे, अमोल शेटे उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात प्रशासन डॉक्टर यांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले. याच प्रकारचे रक्तदान शिबिर प्रत्येक महिन्याला पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये निरंकारी मिशन तर्फे आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.