Talegaon Dabhade News : परिसरातील शाळांमध्ये वर्ग निर्जंतुकिकरण व स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू

एमपीसी न्यूज – कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटींवर राज्य शासनाने सोमवार (दि.२३) पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

त्या पार्श्वभूमीवर मावळासह तळेगाव शहर परिसरातील अनेक शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांनी पूर्वतयारी म्हणून शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणावर भर दिल्याचे पहावयास मिळत आहे. तळेगाव शहरात नववी आणि दहावीचे वर्ग असलेल्या नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या दोन शाळा आहेत. तर अनेक संस्थांच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच ज्युनिअर कॉलेज आहेत. विद्यार्थीहित केंद्रबिंदू ठेवून संस्था चालकांनी वर्ग सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

यावेळी शाळेत थर्मामीटर, ऑक्सिमिटर, थर्मल स्क्रीनिंग आणि जंतुनाशक ठेवण्यात आली आहेत. आता शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोविड 19 साठीची आरटीपीसीआर चाचणी 22 नोव्हेंबर पूर्वी करणे बंधनकारक आहे. तर वर्ग खोल्या, स्टाफरूम यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

यापुढे वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार असून सहा फुटांचे अंतर पाळावे लागणार आहे. शाळा वाहतुकीच्या वाहनांचेही निर्जंतुकीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची दररोज नियमितपणे साधी आरोग्य तपासणी (थर्मल स्क्रीनिंग) केली जाणार आहे. फिजिकल डिस्टनसिंगला महत्त्व  दिले जाणार आहे. शाळेत जंतुनाशक, साबण आणि पाणी यांची उपलब्धता करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ सचिव संतोष खांडगे 
कोविड १९च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थीहीत केंद्रबिंदू मानून सर्व उपाययोजना करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. फिजिकल डिस्टन्सिंग संदर्भात विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसे आदेश शाळा प्रशासनाला दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.