Talegaon Dabhade News: तळेगाव येथील डॉक्टरांचे यश; कोरोनावरील संशोधनाची जागतिक स्तरावर दखल

विषाणू हा नाक व घसा येथे प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतो. 0.5 टक्के पोवोडीन, आयोडीन, गार्गल व नाकाचे ड्रॉप वापरल्याने विषाणूचा भार कमी होवून त्याचा प्रसार मंदावण्यामध्ये मदत होवू शकते.

एमपीसी न्यूज- जागतिक पातळीवर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. या विष्णूचा प्रसार हा मुख्यत: बोलणे, खोकणे, शिंकणे यातून तयार होणाऱ्या ड्रॉपलेट व एरोसोलमुळे हवेतून होतो. म्हणून अतिशय वेगाने पसरणारा हा विषाणू आहे. आजपर्यंत या विषाणूवर कोणतेही औषध व लस तयार झालेले नाही. याचा प्रसार रोखण्यासाठी चेहऱ्यावर मास्क आणि फेस शिल्डचा वापर होत आहे. विविध पातळीवर अनेक उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशाच एका प्रयत्नाचा भाग म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले प्रबंध वाचून तळेगाव येथील डॉ. मुबारक खान आणि डॉ. सपना परब यांनी अतिशय सोपा असा उपाय कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शोधला आहे.

डॉ. मंदार परांजपे यांनी एका प्रबंधाचा आधार घेवून याबद्दल पुढे संशोधन करण्याचे सुचवले. 10 टक्के पोविडीन आयोडीन हे मागील एक शतकापासून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये जंतूनाशक म्हणून त्वचेवर वापरले जाते. तसेच ते 2 टक्केमध्ये गार्गल मधून ही उपलब्ध आहे.

शेकडो प्रबंधाचा संदर्भ घेवून डॉ. मुबारक खान यांनी 10 टक्के पोवोडीन आयोडीनपासून अत्यंत सौम्य असे 0.5 टक्केचे द्रावण तयार केले. या द्रावणाचा वापर वेगवेगळ्या विषाणूंना निष्क्रिय करण्यासाठी वापरला गेला आहे. आजच्या घडीला हे 0.5 टक्के द्रावण बाजारात उपलब्ध नाही. म्हणूनच डॉ. मुबारक खान हे स्वत: ते तयार करून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णास देतात.

डॉ. सपना परब यांनी 0.5 टक्के द्रावणाचा वापर रोज कित्येक रुग्णांमधून करतात. याचा शोध निबंध अमेरिकन जर्नलने नुकताच प्रकाशित केला. या 0.5 टक्के पोवोडीन आयोडीनने कोरोनापासून पूर्णतः मुक्ती मिळते, असा दावा डॉ. खान, डॉ. परब आणि डॉ. परांजपे यांनी केलेला नाही. तसेच याचा वापर हा फक्त नाक आणि घसा मार्फत विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी करावा, असे आवाहन डॉ. मुबारक खान यांनी केले आहे.

विषाणू हा नाक व घसा येथे प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतो. 0.5 टक्के पोवोडीन, आयोडीन, गार्गल व नाकाचे ड्रॉप वापरल्याने विषाणूचा भार कमी होवून त्याचा प्रसार मंदावण्यामध्ये मदत होवू शकते. बाधित रुग्ण तसेच प्रत्येकजण याचा वापर करू शकतात.

प्रत्येक हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण मुख्यत: कान, नाक व घसा तसेच दातांच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे 0.5 टक्के पोवोडीन, आयोडीन, गार्गल व नाकाचे ड्रॉप म्हणून वापरल्यास तपासणी करताना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होवू शकते. तसेच सर्व डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचारी यांनी गुळण्या व ड्रॉप वापरल्यास त्यांना कोरोनापासून बचावासाठी मदत होवू शकते. बाधित रुग्ण तसेच प्रत्येकजण याचा वापर करू शकतात.

सुश्रुत ई.एन.टी. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला याचा वापर कसा करायचा तसेच घ्यावयाची काळजी याबद्दल डॉ. शिरीन खान जातीने मार्गदर्शन करतात.

अशाप्रकारे हे द्रावण वापरल्याने कुठल्याही पद्धतीचे साईड इफेक्ट होत नाहीत. अशाप्रकारचे संशोधन हे अमेरिकन कान, नाक, घसा जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. अत्यंत सोपा असा उपाय शोधल्यामुळे डॉ. मुबारक खान, डॉ. सपना परब आणि डॉ. मंदार परांजपे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.