Talegaon Dabhade News : तळेगाव भाजी मंडईतील व्यावसायिकांनी गिरवले माहिती अधिकाराचे धडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील स्त्री शक्ती केंद्रातील महिला व भाजी मंडईतील व्यावसायिक यांनी माहिती अधिकार कायदा काय असतो,  त्याचा वापर आपण कसा करु शकतो याचे ( Talegaon Dabhade News ) धडे गिरवले आहे. त्याच्यासाठी खास मंगळवारी (दि.31) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व आवाज न्यूज वृत्त निवेदिका रेश्मा फडतरे यांनी आयोजन केले होते.

Bhosari Crime News : किरकोळ कारणावरून कुटंबीयांना कोयत्याने मारहाण करणारे अटकेत

यावेळी प्रदीप नाईक यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 याचे प्रशिक्षण उपस्थितांना दिले. माहिती मिळवणे, हा कायद्याने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे. त्याचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करत त्यांच्या शंकाचे निरसन नाईक यांनी केले. तसेच तळागाळापर्यंत हे ज्ञान ( Talegaon Dabhade News ) पोहचविण्याची संधी दिली म्हणून आयोजकांचे त्यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.