Talegaon Dabhade News : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी दिला पदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचेकडे सुपूर्द केला असून नगराध्यक्षांनी तो मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे दिला आहे.

यावेळी माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, हेमलता खळदे, मंगल भेगडे, संगीता शेळके, नगरसेवक अरुण माने, रोहित लांघे उपस्थित होते.

वैशाली दाभाडे यांनी 7 फेब्रुवारी 2020 मध्ये उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला होता. त्या प्रभाग क्रमांक 9 मधून तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडून निवडून आल्या आहेत. यांचेकडे यावर्षी पदसिद्ध पाणीपुरवठा सभापती पद होते. त्यांनी या अगोदर गेली चार वर्षांमध्ये विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम केले आहे. व त्यांनी आपल्या कामांमधून शहर विकासाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी इतर सदस्यांना उपनगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळावी. म्हणून राजीनामा दिला असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.