22.8 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Talegaon-Dabhade News: तळेगाव-दाभाडे बस स्थानकात टोळक्याकडून तोडफोड

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : तळेगाव-दाभाडे बस स्थानकात टोळक्याने तोडफोड करून नुकसान केले. तसेच एकास मारहाण करून दुखापत केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री आठ ते शनिवारी (दि. 30) पहाटे पाच वाजताच्या कालावधीत घडली.  याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Talegaon-Dabhade News) त्यानुसार सहा ते सात अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : पिंपरीत दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण

डेपो मॅनेजर प्रमोद बबन गायतोंडे (वय 53, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Talegaon-Dabhade News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव दाभाडे बस स्थानकात शुक्रवारी रात्री उशिरा सहा ते सात जणांच्या टोळक्याने कौशल कुमार याला हाताने व बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. त्यांनतर नियंत्रण कक्षासमोरील काच फोडून दोन हजार रुपये, 20 हजारांचे पीआयएस मॉनिटर, 20 हजारांचे चार सीसीटीव्ही कॅमेरे, दोन हजारांच्या ट्यूब लाईट असे एकूण 42 हजार 200 रुपयांचे नुकसान केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news