Talegaon Dabhade News : राष्ट्र उभारणीसाठी लागणारे विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करतात – संतोष खांडगे

'शिक्षक आपल्या दारी' उपक्रम राबवण्याचे शिक्षकांना आवाहन

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व आदर्श व्यक्तिमत्व तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. राष्ट्र उभारणीसाठी लागणारे विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षक हा ज्ञानदानाचे काम करत भविष्यातील आदर्श पिढी घडवण्याचा प्रयत्न करत असतात, असे मत नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधत तळेगाव येथील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतिने संस्थेतील नवीन समर्थ विद्यालय, मामासाहेब खांडगे विद्यालय, ॲड पु वा परांजपे विद्यालय, पैसाफंड प्राथमिक शाळा, प्रगती विद्यामंदिर इंदोरी, इंजिनीअरिंग काॅलेज, पवनानगर, एकविरा विद्यामंदिर कार्ला, छत्रपती शिवाजी विद्यालय कान्हे या सर्व शाळां व कॉलेजमध्ये जाऊन तेथील ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी संतोष खांडगे बोलत होते.

यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संस्थेचे संचालक व एकविरा विद्या मंदिर शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, नवीन समर्थ विद्यालय शालेय समिती अध्यक्ष महेश शहा उपस्थित होते.

पुढे बोलताना संतोष खांडगे म्हणाले राष्ट्र उभारणीसाठी लागणारे विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतो, शिक्षक हा ज्ञानदानाचे काम करत भविष्यातील आदर्श पिढी घडविण्याचा व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात येत असल्याचे खांडगे यांनी सांगितले.

जसा आपण ‘संस्था आपल्या दारी’ उपक्रम राबवत आहे त्याप्रमाणे कोरोना प्रादूर्भावामुळे शाळा बंद आहे यासाठी शिक्षकांनी देखील वाड्या वस्त्यांवर जाऊन ‘शिक्षक आपल्या दारी ‘उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे व त्यांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन शिक्षकांना केले.

यावेळी संस्थेतील सर्व शाळा व ज्युनियर कॅालेजमध्ये ज्ञानदानाचे काम करणारे प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.