Talegaon Dabhade News: टेम्पोमधून गोमांस घेऊन जाणा-या दोघांना अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – गोमांस कापणे तसेच वाहतूक व विक्री करण्यास बंदी असताना टेम्पोमधून गोमांस घेऊन जाणा-या दोघांना उर्से टोलनाक्यावर शुक्रवारी (दि.2) अटक करण्यात आली. साता-यातील ढाब्यावरुन आणलेले हे मांस मुंबईच्या दिशेने ते घेऊन चालेले होते. 

याप्रकरणी टेम्पो चालक अफरोज सलिम शेख (वय 25, रा. कुर्ला ईस्ट, मुंबई ) व क्लिनर शिराज अहमद अन्सारी (वय 34) यांना ताब्यात घेतले आहे. तर, मांस विकत घेणार असलेला निसार शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक विक्रम भेगडे (वय 22, रा. भेगडे आळी, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे एमएच 04 एचडी 5288 या 407 टेम्पो मधून साता-यातील ढाब्यावरुन आणलेले गोमांस मुंबईच्या दिशेने ते घेऊन चालेले होते. सहा लाख किंमतीचे असलेले हे गोमांस ते निसार शेख याला विकणार होते. पोलिसांनी निसार शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन टेम्पो चालक व क्लिनर याला उर्से टोलनाक्यावरुन ताब्यात घेतले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.