_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade News: ‘हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा’

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित वाल्मिकी समाजातील मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्व घटनांची जबाबदारी स्वीकारुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मावळ तालुका वाल्मिकी समाज, जनसेवा विकास समिती तळेगांव दाभाडे आणि तळेगांव शहर नागरिकांच्या वतीने करण्यात आली. 

मावळ तालुका वाल्मिकी समाज, जनसेवा विकास समिती तळेगांव दाभाडे आणि तळेगांव शहर नागरिकांच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित मुलीला  तळेगाव स्टेशन येथील मराठा क्रांती चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली.

कुटुंबियांच्या संमतीशिवाय पीडित मुलीच्या मृतदेहावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अटक आणि त्यांना पोलिसांकडून करण्यात आलेली धक्काबुक्की, या घटना पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे स्पष्ट होते. तसेच तेथे जंगलराज सुरु असल्याचे दिसून येते, असा आरोप यावेळी करण्यात आला.

जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर आवारे, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, अरुण सोळंकी, अप्पा कारंडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक गणेश खांडगे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, सुनील पवार, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे, महेश वाल्मिकी, शेखर रघुवंशी, रमेश चव्हाण, मनीषा रघुवंशी, विद्या रघुवंशी, अनिता वाल्मिकी आदी उपस्थित होते.

जनरल हॉस्पिटलमधील कर्मचारी वसाहत ते मराठा क्रांती चौक असा कँडल मार्च काढून चौकात श्रद्धांजली सभा पार पाडली

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.